लाच प्रकरण – मुख्याध्यापक व शिक्षकाला जामीन मंजूर
संस्थाचालक व्यंकटराव गुंड यांचा अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज, शनिवारी सुनावणी
उस्मानाबाद – समय सारथी
संस्थेतील सहशिक्षकाची वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करून ती मंजूर करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागून 25 हजारांची लाच स्वीकारले प्रकरनातील अटक आरोपी मुख्याध्यापक व शिक्षकाला उस्मानाबाद कोर्टाने जामीन मंजूर केला आहे तर फरार आरोपी संस्थाचालक व्यंकटराव गुंड यांनी अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज केला आहे त्यावर शनिवारी सुनावणी होणार आहे.
भाजप नेते तथा नामांकीत रुपामाता समुहाचे अध्यक्ष व्यंकटराव गुंड यांच्यासह मुख्याध्यापक राजेंद्र सूर्यवंशी व सहशिक्षक अमोल गुंड यांच्यावर बेंबळी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या लाच प्रकरणी मुख्याध्यापक सूर्यवंशी व सहशिक्षक अमोल गुंड यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुख्य आरोपी व्यंकटराव गुंड हे फरार आहेत. व्यंकट गुंड हे व्यवसायाने उद्योजक, शिक्षणसम्राट, बँकेचे चेअरमन,वकील आहेत. व्यंकट गुंड हे या लाचेच्या कटातील मुख्य आरोपी आहेत.
संस्थेच्या बांधकाम निधीच्या नावाखाली 50 हजार रुपये लाच म्हणून मागण्यात आली त्यात 25 हजारावर व्यंकट गुंड व मुख्याध्यापक सूर्यवंशी यांनी सेटलमेंट केली. संस्थाचालक व मुख्याध्यापक यांनी शिक्षकाला 50 हजारांची लाच मागितली आणि 25 हजार रक्कम अंतीम केली, लाचेची ही रक्कम स्वतः न स्वीकारताएका सहशिक्षक अमोल गुंड याला घ्यायला लावला होती मात्र सहशिक्षक लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अलगद अडकला.
पाडोळी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक महाविद्यालय येथे लाचलुचपत विभागाने कारवाई केली. लाचलुचपत विभागाचे कर्तव्यदक्ष पोलीस उप अधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणात कारवाई करण्यात आली. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. श्री.राहुल खाडे , अपर पोलीस अधीक्षक श्री. विशाल खांबे ला. प्र.वि.औरंगाबाद प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, उस्मानाबाद यांचे मार्गदर्शनाखाली गौरीशंकर पाबळे, पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि. उस्मानाबाद यांनी केली. याकामी त्यांना पोलीस अंमलदार मधुकर जाधव, विष्णू बेळे, चालक दत्तात्रय करडे यांनी मदत केली.