राज्यसभा निवडणूक – आमदारांना सफारी गाडीची ऑफर , उस्मानाबादचे निटूरे करणार उमेदवारी दाखल
उस्मानाबाद – समय सारथी
एकीकडे राज्यसभा निवडणुकीत राजकीय रस्सीखेच व घोडेबाजार जोरात सुरु असताना उस्मानाबाद येथील एका राजकीय नेत्याने आमदारांना सफारी गाडीची ऑफर दिली आहे.राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अध्यक्ष अरुण निटूरे हे उद्या 31 मे रोजी मुंबई विधानभवन येथे राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
राज्यसभा निवडणुकीत निटूरे यांना आमदारांनी सहकार्य केल्यास त्यांना प्रत्येकी एक टाटा सफारी गाडी भेट म्हणून देणार असल्याची त्यांची घोषणा आहे. निटूरे यांनी 45 सफारी गाड्यांचे कोटेशन सुद्धा घेतले असून प्रती गाडी 26 लाखप्रमाणे 11 कोटी 81 लाख खर्च करणार आहेत.निटूरे यांनी त्यांच्या या ऑफरबाबत फेसबुक व इतर माध्यमातून पोस्ट केले आहे. त्यांच्या या ऑफरला कसा प्रतिसाद मिळतो हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
निटूरे यांनी यापूर्वी वाराणसी मध्ये नरेंद्र मोदी यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करीत निवडणूक लढविली होती.