राजकीय वारी – तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव विठ्ठलाचे तुळजाभवानीचे दर्शन घेणार – पक्ष प्रवेश होणार
धाराशिव – समय सारथी
भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस पक्षाचे अध्यक्ष तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (केसीआर) हे संपूर्ण मंत्रीमंडळासह पंढरपूर व तुळजापूर येथे येणार असुन ते विठ्ठल दर्शनानंतर तुळजाभवानी मातेचे दर्शन घेणार आहेत. पंढरपूरच्या वाटेवर असलेल्या पालख्या, दिंडी व वारकऱ्यावर ते पुष्पवृष्टी करतील. सध्या बीआरएस पक्ष महाराष्ट्रात मोठ्या झपाट्याने वाढत असुन चांगला प्रतिसाद मिळत आहे.
26 व 27 जुन रोजी सोलापूर व धाराशिव जिल्हा असुन मुख्यमंत्री केसीआर हे पुर्ण मंत्रीमंडळ व महत्वाचे पदाधिकारी अश्या ताफासह 26 जुन रोजी सोलापूरला येतील त्यानंतर ते 27 जुन रोजी हेलिकॉप्टरने पंढरपूर जाऊन विठ्ठल दर्शन घेतील व नंतर तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन हैद्राबादला जातील असा नियोजित दौरा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 28 जुन रोजी पंढरपूर येणार असुन ते विठ्ठलाच्या महापुजेला उपस्थित राहणार आहेत.
आगामी निवडूका डोळ्यासमोर ठेवून बीआरएस पक्षाने विस्तार सुरु केला असुन वारीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न असणार आहे. पंढरपूर व तुळजापूर दौऱ्या दरम्यान काही पक्षप्रवेश होणार असल्याची सुद्धा चर्चा आहे.