मुलासारखे सांभाळले, ढाल बनून उभा राहणार – साथ सोडणार नाही, खासदार ओमराजे निंबाळकर
माझ्यासाठी उद्धव ठाकरे यांनी राणा पाटील यांना विरोध केला, प्रवेश व तिकीट नाकारले
उस्मानाबाद – समय सारथी
शिवसेनेचे खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे दावे सपशेल खोटे असल्याचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले आहे. शिवसेना पक्षप्रमुखांची ढाल बनून आम्ही सर्व खासदार त्यांच्यासोबत आहोत, उध्दव ठाकरे यांनी मला मुलासारखे सांभाळले त्यामुळे त्यांची साथ सोडणे शक्यच नाही असे ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले.
उध्दव ठाकरेंनी माझ्या विरोधकाला म्हणजे राणाजगजीतसिंह पाटील यांना केवळ माझ्यामुळे शिवसेना पक्षात घेतले नाही. विधानसभा निवडणुकीवेळी उस्मानाबादची जागा शिवसेनेकडे होती त्यावेळी राणा पाटील यांनी शिवसेनेच्या तिकिटावर लढवण्याची तयारी दाखवली मात्र माझा संघर्ष त्यांनी बघितलेला असल्याने त्यांनी राणा पाटलांना तिकिट नाकारले असा गोप्यस्फोट ओमराजे निंबाळकर यांनी केला
मला उद्धव ठाकरे यांनी खूप प्रेम सत्ता दिली त्यामुळे अशा माणसाला संकट समयी सोडून जाणे कदापिही शक्य नाही असे सांगत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. माझ्या माहितीप्रमाणे शिवसेनेचा एकही खासदार पक्ष सोडून जाणार नाही असे सांगितले.
======
*शिंदेच्या तावडीतून असे निसटले शिवसेना आमदार कैलास पाटील …. रातोरात गाठले मातोश्री, एकनिष्ठ आमदार*
https://www.samaysarathi.com/2022/06/MLA-kailas-.html?m=1