मलकापूरचे एकनाथ लोमटे महाराज यांच्यावर विनयभंगचा गुन्हा नोंद
उस्मानाबाद – समय सारथी
राज्यभर प्रसिद्ध असणारे येरमाळा जवळील मलकापूरचे स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ सुभाष लोमटे महाराज यांच्यावर विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला मलकापूर येथील मठात दर्शनासाठी गेली असता महाराजांनी विनयभंग केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेला प्रसादाच्या पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला असून त्याची क्लिप माझ्याकडे असल्याचे धमकावत विनयभंग केल्याचा पीडित महिलेचा आरोप आहे. महिलेच्या तक्रारीवरून येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराजवर या अगोदर ही अनेक फसवणूकीच्या व भोंदूगिरीच्या तक्रारी आहेत. राजकिय वरदहस्त असल्याने महाराज अनेकदा चर्चेत आले आहेत.
दिसतानाच हा भामटा दिसतोय… मठाचा पूर्ण पत्ता पाठवणे.