धाराशिव – समय सारथी
खासदार ओमराजे निंबाळकर यांना केंद्रात मंत्रीपद दिले जाणार असल्याची चर्चा सुरु असतानाच ओमराजे यांनी यांनी मंत्री पदाबाबत मोठा खुलासा केला आहे. मी कोणत्याही मंत्रीपदासाठी पक्षात गेलो नाही किंवा सत्ताधाऱ्यांसोबत गेलो नाही. मला जरी केंद्रात मंत्रीपद दिले, तरी मी ते घेणार नाही. मी त्यासाठी गेलो नाही, आपल्या या निर्णयाचे कारण येणारा काळच देईल, असे ते म्हणाले.
शिवसेना उबाठा गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ओमराजे हे प्रथम धाराशिव येथे आले, त्यावेळी त्यांनी पत्रकार यांच्याशी बोलताना भुमिका स्पष्ट केली. केंद्रात मंत्री पद घेणार नाही असे ओमराजे म्हणत असले तरी आगामी काळात अनेक बाबी स्पष्ट होणार आहेत, त्यांचे मंत्री पदासाठी नाव चर्चेत आहे. शिवसैनिकांची नाराजी मला 100 टक्के मान्य आहे, ती कामातून सिद्ध करून दुर करू असे ते म्हणाले.
कुचंबणा होत असल्यामुळे मी हा निर्णय घेतला असुन येणाऱ्या काळात कामातून दाखवून देईल. धाराशिव शहरातील उद्यान व आठवडी बाजारासाठी 18 कोटी रुपयांच्या कामाला स्थगिती दिली, सत्तेत गेल्यावर तो मंजुर झाला. टिकेचे विष सुद्धा सहन करायला मी तयार आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, उद्योग, तेरणा व मांजरा नदीवर बॅरेज, सबस्टेशन, शेतकऱ्यांना वीज, फिडर ही कामे प्रत्यक्षात करणार आहे.
उद्धव ठाकरे जरी माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघात येऊन सभा घेत असले, तरी मी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कधीही काहीही बोलणार नाही. ठाकरे व माझे नाते भावनिक आहे, त्यांनी माझ्यावर वाटेल ती टीका करावी पण त्यांनी व इतरांनी माझ्या कुटुंबाला राजकारणात ओढू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. माझ्यावर कितीही टीका होत असली, तरी मी ज्या कारणासाठी पक्ष सोडलाय आणि ज्या निर्णयाप्रती गेलोय, त्याचे उत्तर वेळच देईल.
आपले राजकीय विरोधक हे अत्यंत नीच वृत्तीचे असल्याचे सांगत त्यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे एकमतही नको. मी भुमिका बदलली नाही, या जन्मात तरी हे शक्य नाही. आपला विरोध पक्षाला नसून या विशिष्ट प्रवृत्तीला असल्याचे त्यांनी ओमराजेंनी स्पष्ट केले.











