मंत्री डॉ तानाजी सावंत यांचा भाजपला इशारा – धाराशिव लोकसभा आमचीच, गृहीत धरून सहज घेऊ नका
धाराशिव – समय सारथी
आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी भाजपला इशारा दिला आहे. आम्हाला कोणी गृहीत धरून सहज घेतले तर ते आम्ही मान्य करणार नाही. 2024 ची धाराशिव लोकसभा जागा शिवसेनाच लढवणार असे सांगत त्यांनी रणशिंग फुकले आहे.
धाराशिव लोकसभा मतदार संघाच्या जागेवरून भाजप शिवसेना वाद यानिमित्ताने पेटला आहे. आम्ही जिकूंन आलेली 18 पैकी एकही जागा भाजपला सोडणार नाही. आमचा गट वेगळा आहे, आमचे अस्तित्व वेगळे आहे. आम्ही शिवसेना आहोत, पारंपरिक जागा आमच्याकडे आहे.
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी धाराशिव येथे भाजपचा खासदार होईल असे वक्तव्य केले होते त्यावर उत्तर देताना मंत्री सावंत यांनी भाजपला इशारा दिला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे दोघे दिल्लीत असुन जागा वाटप, युतीवर चर्चा होताना सत्तेतील मंत्र्याने भाजपला इशारा दिल्याने जागा वाटपात रस्सीखेच होणार आहे.