भुसंपादन अधिकारी राजकुमार माने यांचा पदभार काढा – पालकमंत्री डॉ सावंत यांचे निर्देश
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद येथील मध्यम प्रकल्पाचे भुसंपादन अधिकारी राजकुमार माने यांच्याकडे असलेला सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्गचे कामकाज उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी यांना देण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी दिले आहेत. पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी सोमनाथ रेड्डी यांनी याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी यांना पाठविले आहे.
राजकुमार माने यांच्या बाबत अनेक तक्रारी पालकमंत्री डॉ सावंत यांच्या कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्ग करीता भुसंपादन करताना संबंधित शेतकरी यांच्याशी माने हे योग्य संवाद साधत नसल्याबाबत व दमदाटी करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्या अनुषंगाने माने यांच्याकडील पदभार काढावा असे निर्देश पालकमंत्री डॉ सावंत यांनी दिले आहेत.