भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला – देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निषेध
मुंबई – समय सारथी
भाजप नेते मोहित कंबोज भारतीय यांच्या गाडीवर शिवसैनकांनी हल्ला केला. मोहित कंबोज भारतीय हे कलानगर भागातून आपल्या घराकडे जात असताना शिवसैनिकांनी हल्ला केला.
विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली. मोहित भारतीय यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे डरपोक लोकांनी सत्तेच्या भरवशावर केलेला उन्माद आहे.महाराष्ट्रात सरकारच्या भ्रष्टाचारावर बोलाल तर तुम्हाला जिवे मारू, ही नवी संस्कृती सुरू झाली आहे. पण तरीही महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध हा लढा थांबणार नाही. आता मुंबई पोलिस या हल्लेखोरांवर कारवाई करणार की एखादे कथानक रचून, या भेकड हल्लेखोरांना वाचविणार ? मुंबई शहरात आपण सीसीटीव्हीचे जाळे सर्वत्र उभारले आहे, त्यातून संपूर्ण सत्य बाहेर येईलच.या हल्ल्याचा तीव्र निषेध करताना दोषींवर कठोर कारवाईची आमची मागणी आहे.