धाराशिव – समय सारथी
जालना येथील घटनेच्या निषेधार्थ धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आली असुन आज दिवसभर विविध ठिकाणी आंदोलने व वेगवेगळ्या मार्गाने निषेध केला जाणार आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील सकल मराठा बांधवांना पोलीस प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येते की, धाराशिव जिल्हा हा शांतता प्रिय असून, याची शांतता भंग होता कामा नये करिता आपण सर्व मराठा बांधवांनी शांततेचा मार्ग अवलंबवावा पोलिस प्रशासन सदैव आपल्या सोबत आहे. आपल्याकडून आज धाराशिव जिल्हा बंद आवाहनामध्ये कुठल्याही प्रकारची शासकीय अथवा खाजगी मालमत्तेचे , जीवित अथवा वित्त हानी होता कामा नये. याची सकल मराठा बांधवांनी दखल घ्यावी व आपला जिल्हा शांतता प्रिय आहे हे सर्वांना दाखवून द्यावे असे आवाहन अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.