पुरग्रस्ताच्या मदत निधी संकलनावर डल्ला – उस्मानाबाद जिल्हा परिषदेतील प्रकार, 15 लाखांचा हिशोब लागेना
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्हयातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मधील कर्मचाऱ्यांनी गेल्या 3 वर्षांपूर्वी पूरग्रस्तांसाठी निधी गोळा केला होता त्या निधीपैकी १४ लाख ८३ हजारावर अधिकाऱ्यानी डल्ला मारल्या चे समोर आले आहे. सांगली कोल्हापुर येथे तीन वर्षापुर्वी आलेल्या पुरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले होते तर कित्येत नागरिक विस्थापित झाले होते विस्थापित नागरिकासाठी मदत म्हणुन निधी गोळा केला मात्र तो आता अखर्चित आहे.
तीन वर्षा सांगली-कोल्हापुर येथे पुराने थैमान घातले होते या पुरात कित्येत कुटुंबाचे नुकसान झाले होते कित्येक कुटुंब उघडयावर आली होती. या विस्थापित कुटुंबासाठी राज्यातुन मदत येत होती उस्मानाबाद जिल्हयातील जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील आधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या पुरग्रस्तासाठी २३ लाख ८३ हजार ५१३ रुपये निधी गोळा केला होता. त्यापैकी ९ लाख एक हजार ४१० रुपयाच्या वस्तुचे वाटप सांगली येथील पुरग्रस्तानां केले होते.
उर्वरित निधीच्या नियोजन बाबत २७ सप्टेंबर २०१९ मध्ये बैठक झाली होती या वेळी सर्व आधिकारी उपस्थित होते पण नियोजन झाले नसल्यामुळे शिल्लक निधी १४ लाख ८३ हजार १०३ रुपये निर्णय झाला नाही नंतर कोरोणा काळात अनेक अधिकाऱ्याच्या बदल्या झाल्या आणि याच काळात निधी संकलनाची संचिका गहाळ झाली.
अधिकाऱ्याच्या बदल्या नंतर गहाळ झालेली संचिका अचानक अवतरली असुन यातील शिल्लक निधीवर मात्र डल्ला मारल्याचे दिसुन आले. शिल्लक निधी कुठे खर्च झाला ? कुठे वाटले ? काय वाटप केले ? कोणी वाटप केले ? काय खरेदी केले ? याचा साधा उल्लेख देखील या संचिकेत नाही हे विशेष मग निधी कुठे गेला हा प्रश्न आहे.
सांगली कोल्हापुर येथील पुरग्रस्तानां मदत म्हणुन गोळा केलेल्या निधीपैकी शिल्लक निधीवर कोणी डल्ला मारला या दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी 11 जानेवारी 2022 रोजी उस्मानाबाद जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देवुन दोषीची चौकशी करुन दोषीवर कारवाईची मागणी केली होती मात्र अदयाप पर्यंत दोषीवर कारवाई झाली नाही.