पुणे महानगर नियोजन समितीचे गठन – आमदार डॉ तानाजीराव सावंत यांची सदस्यपदी नेमणुक
उस्मानाबाद – समय सारथी
पुणे महानगर नियोजन समितीचे गठन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले असुन यात शिवसेनेचे माजी मंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम परंडा मतदार संघाचे आमदार डॉ प्रा तानाजीराव सावंत यांचा विशेष निमंत्रीत सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. राज्याच्या नगर विकास विभागाने ही अधिसूचना जारी केली आहे. या समितीत खासदार संजय राऊत,खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह आमदार तानाजीराव सावंत , आमदार संग्राम थोपटे यांचा समावेश आहे. आगामी 5 वर्षांसाठी ही समिती गठीत करण्यात आली असुन यात लोकप्रतिनिधी व अधिकारी अश्या 30 जणांचा समावेश आहे.