नामांतरवर हरकती – छत्रपती संभाजी नगर व धाराशिव मुद्दा
धाराशिव – समय सारथी
छत्रपती संभाजीनगर नामांतरवरून 69 हजार पेक्षा अधिक हरकती दाखल झाल्या आहेत तर धाराशिव नामांतरावरून 19 हजार हरकती अर्ज विभागीय आयुक्ताकडे दाखल झाले आहेत. आक्षेप नोंदवण्याची 27 मार्चपर्यंत शेवटची मुदत आहे.
छत्रपती संभाजी नगरच्या नामांतरावरून तब्बल 69 हजारांच्या जवळपास आक्षेप दाखल झाले आहेत. छत्रपती संभाजी नगरच्या समर्थनार्थ शिवसेनेकडून शहरातून 30 हजार पोस्ट कार्ड पाठवले जाणार आहेत. सूचना हरकतींचा विभागीय आयुक्त कार्यालयात अक्षरशः खच पडला असुन हरकती दाखल करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात गर्दी होत आहे.