नगराध्यक्ष व सरपंच निवडणुका जनतेतून होणार – पेट्रोल डिझेल दर कमी, मंत्रिमंडळ निर्णय
उस्मानाबाद – समय सारथी
राज्यातील नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व सरपंच पदाच्या निवडी आता जनतेतुन होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. तसेच पेट्रोल 5 रुपये तर डिझेलवर 3 रुपये कपात करण्याची घोषणा केली आहे. आज मध्यरात्री पासून पेट्रोल डिझेल कपात अंमलबजावणी लागू होणार आहे, या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीला 6 हजार कोटींचा बोजा पडणार आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना थेट मतदार करता येणार आहे.
मंत्रिमंडळ बैठक पुढील निर्णय घेण्यात आले.
पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपये प्रति लिटर कर कमी करण्याचा निर्णय
( वित्त विभाग)
राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अभियान” राबविण्यात येणार.
(नगर विकास विभाग)
केंद्र पुरस्कृत अमृत अभियान 2.0 (Atal Mission For Rejuvenation & Urban Transformation) राज्यात राबविणार
(नगर विकास विभाग)
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेणार
(नगर विकास विभाग)
राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा.
(ग्रामविकास विभाग)
अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविणार
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1969 मधील कलम 43 मध्ये सुधारणा.
(ग्रामविकास विभाग)
बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मध्ये सुधारणा.
(पणन विभाग)
आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान / यथोचित गौरव करण्याची (दिनांक 31 जुलै, 2020 रोजी बंद करण्यात आलेली) योजना पुन्हा सुरु करणार
(सामान्य प्रशासन विभाग)