नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर कोरोना पॉझिटिव्ह
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद नगर परिषदेचे शिवसेनेचे नगराध्यक्ष तथा प्रथम नागरिक मकरंद राजे निंबाळकर यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . मकरंद राजे यांना सर्दी व इतर प्राथमिक लक्षणे आढळल्यानंतर त्यांनी स्वतः वेळीच चाचणी केली होती , सध्या त्यांची तब्येत ठीक असून डॉक्टर भारत माने यांच्या सल्ल्यानुसार व निगराणीखाली ते घरीच उपचार घेत आहेत. गेल्या 8 दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी व कार्यकर्ते यांनी काळजी घ्यावी व लक्षणे आढळल्यास तपासणी करून घ्यावी असे आवाहन नगराध्यक्ष निंबाळकर यांनी केले आहे.
उस्मानाबाद शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग झालेला असताना त्यांनी पहिल्या व दुसऱ्या लाटेत थेट मैदानात उतरून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करणे , कंटेन्मेंट झोनची पाहणी करणे , कोविड केअर सेंटर व उपचार हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णसेवा करीत होते त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली.
विशेष म्हणजे कालच शिवसेनेचे आमदार कैलास पाटील हे दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्यांचे संपूर्ण कुटुंब कोरोनाग्रस्त झाले आहे. आमदार पाटील यांची तब्येत चांगली आहे.