धोक्याची घंटा – कोरोना रुग्णांची शंभरी पार , उस्मानाबाद तालुक्यात 47 रुग्ण
उस्मानाबाद जिल्ह्यात रुग्ण संख्या पुन्हा वाढतेय, पॉझिटिव्हीटी दर 5.12 टक्के
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा असुन आज बुधवारी कोरोना रुग्णांची संख्या शंभरी पार झाली आहे. उस्मानाबाद तालुक्यात 47 रुग्ण सापडले असून जिल्ह्यात 1 हजार 979 पैकी 102 रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने पॉझिटिव्हीटी दर हा 5.12 टक्के इतका झाला आहे. जिल्ह्यात यापूर्वी 50 ते 60 च्या आसपास रुग्ण सापडत होते मात्र आज हा आकडा 102 झाला असल्याने ही बाब चिंतेची आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात रुग्ण संख्या पुन्हा वाढत असल्याने काळजी घेण्याची गरज आहे. आजच्या 102 पैकी 9 रुग्ण हे 18 वर्ष वयोगटाखालील असून ते कोरोना रुग्ण सापडलेल्या कुटुंबातील सदस्य आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 102 रुग्ण सापडले असून त्यात 42 रुग्ण हे आरटीपीसीआर चाचणीत तर 60 रुग्ण रॅपिड अँटीजन चाचणीत पॉझिटिव्ह आले आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील सर्वाधिक 47 रुग्णांचा समावेश आहे तर तुळजापूर 4, उमरगा 3, लोहारा 1, कळंब 12, वाशी 4 , भूम 13 व परंडा तालुक्यातील 18 रुग्णांचा समावेश आहे. उस्मानाबाद तालुक्यातील हिंगळजवाडी येथील 80 वर्षीय महिलेचा उपचार दरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. आज 30 रुग्ण उपचार नंतर बरे झाले असून 823 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजवर 61 हजार 5 रुग्ण बरे झाले असून हे प्रमाण 95.67 टक्के आहे तर 60 हजार 87 रुग्णांपैकी 1 हजार 414 रुग्णांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला असून मृत्यू दर हा 2.35 टक्के आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात उपचार घेत असताना 1 हजार 414 रुग्णांचा मृत्यू झाला तर 314 रुग्ण हे बाहेर जिल्ह्यात उपचार घेत असताना व 100 जण पोस्ट कोविड गुंतागुंतमुळे मृत्यू झाला.
7 जुलै – 64 रुग्ण
8 जुलै – 62 रुग्ण
9 जुलै – 55 रुग्ण
10 जुलै – 58 रुग्ण
11 जुलै – 33 रुग्ण
12 जुलै – 67 रुग्ण
13 जुलै – 35 रुग्ण
14 जुलै – 61 रुग्ण
15 जुलै – 51 रुग्ण
16 जुलै – 54 रुग्ण
17 जुलै – 62 रुग्ण
18 जुलै – 57 रुग्ण
19 जुलै – 85 रुग्ण
20 जुलै – 45 रुग्ण
21 जुलै – 50 रुग्ण
22 जुलै – 60 रुग्ण
23 जुलै – 72 रुग्ण
24 जुलै – 69 रुग्ण
25 जुलै – 50 रुग्ण
26 जुलै- 83 रुग्ण
27 जुलै – 74 रुग्ण
28 जुलै – 102 रुग्ण