धोक्याची घंटा – उस्मानाबादेत १३ कोरोनाबाधीतांचा मृत्यु , नगर पालिकेने केला अंत्यविधी
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून स्तिथी गंभीर होत आहे. उस्मानाबाद शहरात आज दिवसभरात कोरोनाने ११ जणांचा बळी घेतला अशी प्राथमिक माहिती आहे तर काल दगावलेल्या दोन जणावर आज नगर परिषदेच्या पथकाने अंत्यविधी करण्यात आला.
आज दिवसभरात ११ जणांचा कोरोनाने बळी गेल्यामुळे दिवसेंदिवस रुग्णांसह मृत्यूचे प्रमाणही वाढतच चालल्याने चिंता वाढली आहे. आजचे ११ आणि कालचे २ असे एकूण १३ जणांवर आज उस्मानाबाद येथील नगर पालिके तर्फे अंत्यविधी करण्यात आले आहेत.