मंकावती तिर्थकुंड हडप प्रकरण – सलग 3 दिवस सुनावणी , कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
उस्मानाबाद – समय सारथी
तुळजापूर येथील प्राचीन मंकावती तिर्थकुंड हडप केल्याप्रकरणी आरोपी देवानंद रोचकरी व त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी यांच्या जामीन अर्जावर आता 15 सप्टेंबर 2021 रोजी फैलला होणार आहे. उस्मानाबाद जिल्हा न्यायालयात 6 सप्टेंबर रोजी रोचकरी बंधूंच्या जामीनावर फैसला होणार होता मात्र तो 7 नंतर 8 सप्टेंबर असे पुढे ढकलत अखेर 15 सप्टेंबर अशी कोर्टाने तारीख दिली आहे त्यामुळे त्यांचा उस्मानाबाद जेलमधील मुक्काम एक आठवड्याने वाढला आहे. दरम्यान 6 सप्टेंबर रोजी रोचकरी यांना तुळजापूर कोर्टात न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने हजर करण्यात आले होते. देवानंद रोचकरी बंधूंना 18 ऑगस्ट अटक झाल्यावर त्यांना कोर्टाने 24 ऑगस्टपर्यंत 6 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती त्यानंतर ते 24 ऑगस्टपासुन उस्मानाबाद जेलमध्ये आहेत.
उस्मानाबाद जिल्हा कोर्टात सुनावणी दरम्यान रोचकरी यांनी कश्या प्रकारे प्राचीन मंकावती तिर्थकुंडबाबत मालकीची चुकीच्या पद्धतीने नोंद घेतली, त्यांच्यावर आजवर दाखल असलेल्या 35 गुन्ह्यांचा इतिहास, वंशावळ यासह अन्य बाजु न्यायाल्यासमोर मांडण्यात आल्या तसेच जिल्हाधिकारी यांच्या स्थगिती आदेश नंतर रोचकरी समर्थकांनी सोशल मीडियावर केलेल्या आनंदोत्सव व इतर बाबी मांडल्या आहेत त्यामुळे जामिनावर काय निकाल येतो याकडे लक्ष लागले आहे.
तुळजापूर येथील तत्कालीन तालुका भुमी अधिक्षक पंडीत डोईफोडे यांनी आत्महत्या केल्याच्या प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यात खुद्द पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी लक्ष घातले असुन या आत्महत्या प्रकरणाची पडद्यामागील कारणे व अज्ञात आरोपी समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रौशन यांनी डोईफोडे आत्महत्या प्रकरणाच्या गुन्ह्याची फाईल व त्याची तपासाची स्तिथी संचिका मागवुन घेतली आहे त्यावर तपास सुरू आहे.
तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरासमोरील तब्बल 1 हजार 244 चौरस मीटर आकाराच्या मंकावती कुंडाची महती स्कंद पुराण , तुळजाई महात्म्य व देविविजय पुराणात आहे. रोचकरी यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचे 307 कलम अंतर्गत तब्बल 6 गुन्हे यापूर्वी नोंद आहेत तर 3 गुन्हे शासकीय कर्मचारी यांना मारहाण व कामात अडथळा आणल्याचे आहेत त्यासह फसवणूक,मुंबई जुगार कायदानुसार गुन्हे नोंद आहेत. रोचकरी यांच्यावर मंकावती प्रकरणात तुळजापूर पोलीस ठाण्यात कलम 420,467,468,469,471 सह 34 भादवी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. सावकारकी , शासकीय ,खासगी जमीन हडप करणे व त्यावर कोर्टाचे आदेश जुगारून अतिक्रमण करणे असे तब्बल 35 गुन्हे पूर्वी नोंद आहेत असा अहवाल पोलिसांनी कोर्टात दिला आहे .
मंकावती कुंड हे देवानंद रोचकरी यांचे आजोबांचे आजोबा मूळ मालक शेटीबा मंकावतीराव रोचकरी यांच्या मालकीची व वडिलोपार्जित असल्याचा लेखी दावा मंत्र्यांकडे केला होता. मंकावतीराव रोचकरी यांचे नावाने मंकावती कुंड आहे तसेच या प्राचीन कुंडाची नोंद त्यांच्या नावावर घ्यावी अशी मागणी केली होती. मंकावतीराव रोचकरी यांच्या मालकीचे हे कुंड असून हि वडिलोपार्जित मालमत्ता पुरातन काळातील असून माझी सातवी पिढी ची या कुंडावर मालकी हक्कात नोंद असून कब्जेदार आहे असे म्हणटले होते.शेटीबा मंकावतीराव यांच्या नंतर अनेक वारस असताना अन्य वारसांना त्यांच्या हक्कापासून वगळून थेट देवानंद रोचकरी यांचे नाव लावण्याचा प्रयत्न केला गेला असा आरोप ऍड जनक कदम – पाटील यांनी केला.