तूर्तास शिथिलता नाही – उस्मानाबाद जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर 10 टक्के पेक्षा जास्त
अशी आहे रुग्ण संख्या व रुग्णालय बेड उपलब्धता स्तिथी
उस्मानाबाद – समय सारथी
ब्रेक द चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली असून कोरोना रुग्ण पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याचे आदेश दिले आहेत मात्र राज्यातील उस्मानाबादसह 10 जिल्ह्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर हा 10 टक्के पेक्षा जास्त असल्याने तूर्तास तरी या जिल्ह्याना दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचा 29 मे पर्यंतचा पॉझिटिव्ह दर हा 10.97 असल्याने मुख्यमंत्री यांनी जाहीर केल्याप्रमाणे काही अटी शिथील होण्याची शक्यता कमीच आहे. उस्मानाबाद, बुलढाणा, कोल्हापूर,मुंबई उप नगरे, पुणे, रायगड,रत्नागिरी, सांगली, सातारा व सिंधुदुर्ग या 10 जिल्ह्याचा यात समावेश असुन सिंधुदुर्गचा सर्वाधिक 21.40 टक्के दर आहे तर सर्वात कमी जळगाव जिल्ह्याचा 2 टक्के आहे.
ब्रेक दि चेनचे आदेश राज्यात सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. २९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली जाईल. 29 मे नुसार उस्मानाबाद जिल्ह्यात 36 टक्के ऑक्सिजन बेड शिल्लक होते.
ऑनलाइन नोंदी प्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्याचा 23 मे ते 29 मे या काळातील साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर हा 10.22 टक्के आहे. या काळात 21 हजार 795 तपासणी करण्यात आल्या त्यात 2 हजार 229 कोरोना रुग्ण सापडले आहेत. राज्य सरकारने उपलब्ध केलेल्या माहितीनुसार 22 मे ते 28 मे या काळात उस्मानाबाद जिल्ह्यात 20 हजार 774 तपासण्या करण्यात आल्या त्यात 2 हजार 279 रुग्ण म्हणजे 10.97 टक्के रुग्ण सापडले. 29 मे पर्यंतचा साप्ताहिक पॉझिटिव्ह दर गृहीत धरला जाणार आहे मात्र गेल्या 3 ते 4 दिवसात उस्मानाबाद जिल्ह्यात 6 ते 8 टक्के रुग्ण पॉझिटिव्ह सापडत आहेत ही दिलासादायक बाब आहे. रॅपिड चाचणीत सुद्धा रुग्ण सापडण्याचे प्रमाण हे कमी 7 ते 10 टक्के दरम्यान आहे.
आयसीएमआरच्या पोर्टेलनुसार उस्मानाबाद जिल्ह्याचा 24 मे ते 30 मे या आठवड्यात साप्ताहिक पॉझिटिव्ह दर हा 10.8 टक्के आहे या काळात 21 हजार 287 तपासणी करण्यात आल्या त्यात 2 हजार 290 रुग्ण सापडले तर कोरोनाचा दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या तीन पटीने वाढली तरी प्रशासनाला मृत्युदर रोखण्यात यश मिळाले आहे. दुसऱ्या लाटेत 1 फेब्रुवारी पासून 30 मे या काळात 1 लाख 85 हजार 714 चाचणी करण्यात आल्या त्यात 40 हजार 303 रुग्ण सापडले या लाटेत 21.7 टक्के पॉझिटिव्हीटी दर होता अशी माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.
कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी झाली म्हणजे संकट टळले नसून लोकांनी दक्षता घ्यावी तसेच प्रशासन सज्ज आहे.कोरोनाची कोणतीही लक्षणे अंगावर न काढता वेळीच तात्काळ उपचार घेणे गरजेचे आहे जेणेकरून मृत्यू टाळता येऊ शकतो , नागरिकांनी काळजी घेण्याचे व तात्काळ उपचार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या आठवड्यात कोरोना बाबत दिलासादायक चित्र असून रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत आहे तर शासकीय व खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध होत आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात 29 मेच्या आकडेवारीनुसार 85 कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटरमधील 965 पैकी 615 ऑक्सिजन बेडचा वापर सुरू होता तर 350 म्हणजे 36.26 टक्के रिकामे होते. 263 आयसीयू पैकी 180 रुग्ण होते तर 83 म्हणजे 31.55 टक्के रिकामे होते तर 4 हजार 584 नॉर्मल बेड पैकी 1 हजार 465 बेडचा वापर रुग्ण करीत होते तर 3 हजार 119 म्हणजे तब्बल 68 टक्के रिकामे होते. एकूण स्तिथी पहिली तर जिल्ह्यात कोरोनासाठी 5 हजार 812 बेड होते त्यापैकी 2 हजार 260 रुग्ण वापर होता तर 3 हजार 552 म्हणजे तब्बल 61 टक्के बेड रिकामे होते. हे समाधानकारक व दिलासादायक चित्र 29 मे चे होते त्यानंतर अनेक रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे तर रुग्ण सापडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे त्यामुळे यापेक्षा अधिक चांगली स्तिथी नक्कीच असणार आहे.
उस्मानाबादसह 10 जिल्हे वगळता इतर ठिकाणी नवीन निर्देशनुसार शिथिलता मिळणार आहे त्याचा निर्णय त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी घेतील. 22 ते 28 मे दरम्यानचा साप्ताहिक पॉझिटिव्ह दर हा 10 टक्के पेक्षा जास्त असलेल्या जिल्ह्यात बुलढाणा 12.73, कोल्हापूर 16.42,मुंबई उप नगरे 11.29, पुणे 14.76, रायगड 18.24 ,रत्नागिरी 19.96, सांगली 16.56, सातारा 18.23 व सिंधुदुर्ग 21.40 टक्के असा आहे.
ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि *एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील* तर तिथे काही नियम शिथिल करण्यात येतील.
सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवता येतील. सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा ( केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल मात्र आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार , रविवार ती बंद राहतील अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील, दुपारी ३ नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील
कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही २५ टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी देईल.
कृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी २ पर्यंत सुरु राहू शकतील. येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकते किंवा शनिवार, रविवार सुरु ठेवण्यास परवानगी देऊ शकते.
*उस्मानाबाद जिल्हा कोरोना स्तिथी*
उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 3 लाख 966 नमुने तपासले त्यापैकी 54 हजार 656 रुग्ण सापडले त्यामुळे रुग्ण सापडण्याचा दर 18.16 टक्के आहे. जिल्ह्यात 50 हजार 217 रुग्ण बरे झाले असून 91.87 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर आहे तर 1233 रुग्णांचा मृत्यू झाला असून 2.25 टक्के मृत्यू दर आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 3 हजार 206 सक्रीय रुग्ण आहे
1 मे – 667 रुग्ण – 19 मृत्यू
2 मे – 486 रुग्ण – 09 मृत्यू
3 मे – 814 रुग्ण – 13 मृत्यू
4 मे – 786 रुग्ण – 11 मृत्यू
5 मे – 783 रुग्ण – 07 मृत्यू
6 मे – 813 रुग्ण – 24 मृत्यू
7 मे – 660 रुग्ण – 08 मृत्यू
8 मे – 629 रुग्ण – 11 मृत्यू
9 मे – 712 रुग्ण – 08 मृत्यू
10 मे – 833 रुग्ण – 14 मृत्यू
11 मे – 676 रुग्ण – 11 मृत्यू
12 मे – 569 रुग्ण – 13 मृत्यू
13 मे – 623 रुग्ण – 08 मृत्यू
14 मे – 458 रुग्ण – 15 मृत्यू
15 मे – 607 रुग्ण – 12 मृत्यू
16 मे – 492 रुग्ण – 09 मृत्यू
17 मे – 547 रुग्ण – 07 मृत्यू
18 मे – 400 रुग्ण – 11 मृत्यू
19 मे – 449 रुग्ण – 08 मृत्यू
20 मे – 534 रुग्ण – 11 मृत्यू
21 मे – 514 रुग्ण – 08 मृत्यू
22 मे – 577 रुग्ण – 11 मृत्यू
23 मे – 392 रुग्ण – 12 मृत्यू
24 मे – 406 रुग्ण – 06 मृत्यू
25 मे – 409 रुग्ण – 08 मृत्यू
26 मे – 306 रुग्ण – 05 मृत्यू
27 मे – 356 रुग्ण – 08 मृत्यू
28 मे – 288 रुग्ण – 08 मृत्यू
29 मे – 303 रुग्ण – 08 मृत्यू
30 मे – 219 रुग्ण – 08 मृत्यू