तुळजाभवानी मंदिरातील 2 पूजाऱ्यावर गुन्हा नोंद , सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
उस्मानाबाद – समय सारथी
तुळजाभवानी मंदिरातील 2 पूजाऱ्यावर 307 कलम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून या पूजाऱ्यांनी मंदिरातील सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण करीत गंभीर झाले केले होते. पुजारी कृष्णा जितकर व संदीप टोले यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा तुळजापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.
मंदिरात भाविकांना दर्शन रांगेत सोडण्याच्या कारणावरून पूजाऱ्यांनी एकत्र येत सुरक्षा रक्षकाला मारहाण केली असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 2 पूजाऱ्यांनी सुरक्षा रक्षक दीपक चौघुले यांना दगड, नारळ व विटांनी गंभीर मारहाण करीत फरफटत बाहेर आणले. सुरक्षा रक्षक चौघुले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी सोलापूरला दाखल झाल्यानंतर त्यांच्या जबाबावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.गुन्हा नोंद झाल्यावर मंदिर प्रशासन या पूजाऱ्यावर नेमकी काय कारवाई करते हे पाहावे लागेल.