उस्मानाबाद – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात येणाऱ्या भाविक, पुजारी, कर्मचारी यांना मास्क सक्ती करण्यात आली असून सोशल डिस्टन्स नियमासह मास्क बंधनकारक असणार आहेत.
मंदीर संस्थांनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी याबाबत आदेश काढले आहेत. कोरोना BF 7 व्हेरीयंट अनुषंगाने उपाय योजना केल्या जात आहेत.
तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्र उत्सव 30 डिसेंबर पासून घटस्थापनाने सुरुवात होत आहे. त्यातच मास्क बंधनकारक केले आहे. राज्यातील अनेक मंदिरात मास्क सक्ती केली जात आहे