डॉक्टरसह सेवकाला 7 हजारांची लाच घेताना अटक
धाराशिव – समय सारथी
भाडेतत्वावर लावलेल्या दोन गाड्यांचे सहा महिन्याचे बिल काढण्यासाठी लॉगबुकवर सही करण्यासाठी 7 हजार रुपयांची लाच घेताना उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ तानाजी शंकर राठोड व अपघात विभागातील सेवक राजू राम थोरात यांना 7 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली आहे.