चौकशी अंती कारवाई हवी , चुकीचा पायंडा बदला व भान ठेवुन परंपरा जपा
उस्मानाबाद – समय सारथी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाटेल तोपर्यंत हे महाविकास आघाडी सरकार टिकेल.जिथं पर्यंत सरकार चालवायचं तो पर्यंत ते चालवतील व नंतर निर्णय घेतील त्यामुळे सरकार टिकवायचा की नाही हे पूर्णपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे असे माजी मंत्री संजय राठोड यांनी उस्मानाबाद येथे सांगितले.महाविकास आघाडीबाबत माजी मंत्री संजय राठोड यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
सध्या सरकार स्थिर आहे मात्र ते टिकवायचे की नाही आणि किती काळ हे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हातात आहे.सरकार स्थापन झाल्या पासून 2 महिन्यात पडेल अशा अफवा भाजप पेरत आहे मात्र सरकारचा निर्णय फक्त ठाकरे यांच्या हातात आहे.
मुख्यमंत्री यांचे काम चांगले असून देशभरात त्यांचे उत्कृष्ट कार्याबद्दल कौतुक झाले आहे.लोकांना शिवसेनेचे सरकारचे काम आवडले आहे त्यामुळे लोकांना व त्यांच्या मनात भाजप सरकार हवे आहे या भाजपच्या दाव्यात तथ्य नाही असे राठोड म्हणाले.
चौकशी अंती कारवाई हवी , चुकीचा पायंडा बदला व भान ठेवुन परंपरा जपा
राजकारनातं कोणत्याही पक्षात कार्यकर्ता बनायला अनेक वर्षे जातात , मला राजकारणात 30 वर्ष लागली या काळात लोकांनी 4 वेळेस निवडून दिले.राजकारणात आरोप होतात त्याची चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी अंती तथ्य असेल तर शिक्षा झाली पाहिजे मात्र सध्या आरोप करून लगेच तथ्य न पाहता शिक्षा देणे पद्धत चुकीची असून हा पायंडा बदलला पाहिजे.कार्यकर्ता म्हणून सर्व पक्षांच्या नेत्यांना विनंती आहे हे बदला असे भावनिक आवाहन राठोड यांनी केले.
महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण, वसंत दादा पाटील यांच्यापासून मोठी वैभवशाली राजकीय परंपरा असुन अनेकांनी आपल्या कामाचा ठसा कार्यातून उमटविला आहे त्याचे भान ठेवून ती परंपरा प्रत्येकांनी जपली पाहिजे. सध्या महाराष्ट्रात संक्रमण परिस्थितीमधुन जे राजकारण सुरू आहे त्याचे सर्व पक्ष,सत्ताधारी विरोधक यांनी याचे भान ठेवले पाहिजे व विचार केला पाहिजे असे राठोड म्हणाले.
बंजारा समाजाचा मेळावा व सहविचार सभा उस्मानाबाद येथे माजी मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला होता यावेळी बंजारा सेवा संघाचे कार्याध्यक्ष डॉ टी सी राठोड, गुलाबराव जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.