ठाकरे गटाला धक्का – शहर प्रमुख मुंडेसह जाधव शिंदे गटात, पालकमंत्री डॉ सावंत यांच्या हस्ते प्रवेश
उस्मानाबाद – समय सारथी
शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून उस्मानाबाद शहर प्रमुख संजय उर्फ पपू मुंडे, भीमा जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.माजी जिल्हा प्रमुख वाहतूक सेना प्रवीण पिंटू पवार, विजय अशोक मुंडे, हरिभाऊ शिंदे यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला यावेळी जिल्हाप्रमुख सुरज साळूंके, सनी पवार यासह पदाधिकारी उपस्थित होते. पुणे येथे आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या हस्ते शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंडे व जाधव हे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जुने शिवसैनिक आहेत.
भीमा जाधव या शिवसैनिक यांनी उस्मानाबाद ते मुंबई असा 500 किमी चा पायी प्रवास दसरा मेळावासाठी केला. त्यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी त्यांची धारासूर मर्दीनी मंदिरात दर्शन घेऊन पायी पाठवणूक केली होती मात्र तिथे मुंबईत गेल्यावर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाधव यांना भेट न दिल्याने ते नाराज झाले होते त्यानंतर त्यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला. मुंडे व जाधव हे ठाकरे गटाच्या अनेक आंदोलनात सक्रीय सहभागी चेहरा होते.