झोपडपट्टी दादा – कळंब येथील आकाश चोंदे याची हर्सूल कारागृहात रवानगी
धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्याअन्वये (एमपीडीए) अंतर्गत कळंब येथील आकाश चोंदे याच्यावर कारवाई करण्यात आली असुन त्याची रवानगी छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे. चोंदे हा सराईत गुन्हेगार होता त्याच्यावर 5 गंभीर गुन्हे नोंद होते त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईने कळंबमध्ये खळबळ उडाली आहे.
कळंब पोलिस स्टेशनने प्रस्ताव पाठवल्यानंतर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी त्याची पडताळणी करत हे प्रकरण जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्याकडे सुनावणीसाठी गेले. त्यांनी सर्व स्तिथी पाहून आरोपीला पकडण्याचे आदेश दिले त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव व कळंब पोलिस निरीक्षक सुरेश साबळे यांच्या पथकाने आकाश चोंदे याला पकडून हर्सूल कारागृहात पाठवले.
झोपडपट्टी कायदा अंतर्गत उच्च न्यायालयात जामीन मागण्याची तरतूद आहे त्यामुळे तूर्तास मुक्काम संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात असणार आहे.