झालं रं झालं धाराशिव झालं, बोला रे बोला धाराशिव बोला – शिवसेना शिंदे गटाचा फटाके, लाडु वाटत जल्लोष
धाराशिव – समय सारथी
झालं रं झालं धाराशिव झालं, बोला रे बोला धाराशिव बोला अशी घोषणाबाजी करीत शिवसेना शिंदे गटाने जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या नेतृत्वात फटाके फोडून व लाडु वाटत जल्लोष साजरा केला. यावेळी स्व बाळासाहेब ठाकरे, स्व आनंद दिघे यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.
शिंदे सरकारने खऱ्या अर्थाने धाराशिव नावाची स्वप्नपूर्ती केली असे सांगत हा ऐतिहासिक दिवस असुन सर्वांनी आज व उद्या तो मोठ्या जल्लोषाने साजरा करावा असे आवाहन केले.बऱ्याच वर्षानंतर कॅबिनेट छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे त्यात हा निर्णय घेतला आहे असे साळुंके म्हणाले. नामांतर आंदोलनाला खरे यश आज मिळाले आहे, अनेकांनी आंदोलने केली
यावेळी अमर माळी, प्रशांत पाटील,नितीन चव्हाण, अमित बनसोडे, सागर कदम, रजनीकांत माळाले, काका खोत, पिंटू पवार, शुभम पांढरे, गणेश जाधव, योगेश तुपे, रणजित चौधरी यासह शिवसैनिक हजर होते.