ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. ए.के. महामुनी यांचे कोरोनाने निधन
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्हा व सत्र न्यायालयाचे ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. अरुण कालिदास महामुनी यांचे 30 एप्रिल रोजी वयाच्या 63 व्या वर्षी पहाटे सोलापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच उस्मानाबाद जिल्ह्यातील व बाहेरील नागरिकांनी, वकिल बांधवांनी, न्यायालयीन कर्मचारी व पक्षकार वर्गाने हळहळ व्यक्त केली. त्यांना विविध सोशल मिडीयावरुन आदरांजली अर्पण करण्यात आली. जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर त्यांचा पक्षकार वर्ग मोठा होता. न्यायालयीन कामकाजात युक्तीवाद व उलटतपास करताना त्यांना ऐकण्यासाठी वकिल बांधवांची विशेष गर्दी जमत असे. अॅड. महामुनी उस्मानाबाद जनता बँकेचे लवाद अधिकारी म्हणून कार्यरत होते. विविध सरकारी, खाजगी व सहकारी संस्था व प्राधिकरणाचे ते कायदेशीर सल्लागार होते. हिंदूस्थान पेट्रोलियमचे सहाय्यक कायदा प्रबंधक अॅड. चंदन महामुनी व सेंट्रल बँक उस्मानाबादचे कॅशिअर नरेंद्र महामुनी यांचे ते वडिल होते. त्यांच्या पश्चात पत्नी साहित्यीक मीना महामुनी, दोन मुले, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
अॅड. महामुनी यांचे जाण्याने एक निष्णात कायदेतज्ञ वकिल गमवल्याची भावना वकिल बांधवातुन व्यक्त करण्यात आली.