जेलवारी – आई भवानीच्या प्राचीन तिजोरीवर दरोडा टाकणाऱ्या नाईकवाडी कारागृहात
पोलीस तपासात अनेक बाबी उघड – लवकरच पुढील कारवाईची अपेक्षा
उस्मानाबाद – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारणाऱ्या तत्कालीन धार्मिक व्यवस्थपक दिलीप नाईकवाडी यांना तुळजापूर तालुका कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यानंतर नाईकवाडी याची उस्मानाबाद येथील जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तब्बल 9 दिवसांच्या पोलीस कोठडी नंतर नाईकवाडी याची जेलवारी सुरू झाली आहे. नाईकवाडी याला 3 वेळेस पोलीस कोठडी देण्यात आली होती त्यात सुरुवातीला 6 नंतर 1 व पुन्हा 2 अशी 9 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती त्यानंतर जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
शिवकालीन व इतर राजेराजवाडे यांनी देवीला अर्पण केलेले 71 प्राचीन नाणे पैकी एकही नाणे नाईकवाडी यांच्याकडून जप्त न झाल्याने व तपासात नाईकवाडी यांच्यासोबत असलेल्या महत्वाच्या साथीदारांची नावे समोर आली नाहीत त्यामुळे त्यांना 3 वेळेस वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली.नाईकवाडी यांना 19 सप्टेंबर 2021 ला अटक केली. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अंजुम शेख करीत असुन त्या व सहायक पोलिस निरीक्षक शरद रोडगे हे करीत आहेत.
तुळजाभवानी देवीच्या पुरातन नाण्यावर डल्ला मारल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यापासून नाईकवाडी तब्बल 1 वर्ष फरार होता मात्र अखेर त्याला तुळजापूर पोलिसांनी अटक केली. नाईकवाडी यांनी 35 तोळे सोने , 71 किलो चांदी व 71 प्राचीन नाणी गायब केल्याप्रकरणी गेल्या वर्षी 13 सप्टेंबर 2020 रोजी गुन्हा नोंद होता. नाईकवाडी यांच्या 17 वर्षाच्या कालावधीत त्यांनी टप्या टप्याने पुरातन नाणी गायब केली आहेत पोलीस तपासात अनेक गोष्टी बाहेर आले आहेत.
पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर कल्याणराव गंगणे यांनी त्याचे वकील शिरीष कुलकर्णी मार्फत तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे 9 मे 2019 रोजी याबाबत लेखी तक्रार केली होती, त्यांनतर झालेल्या चौकशीत हा घोटाळा समोर आला.तुळजाभवानी मंदिर संस्थानचा धार्मिक व्यवस्थापकपदी दिलीप नाईकवाडी कार्यरत असताना 29 नोव्हेंबर 2001 ते 30 नोव्हेंबर 2018 या कालावधीत नाईकवाडी यांनी पदाचा दुरुपयोग केला त्यांच्यावर 323 कलम 420, 464, 409, 467, 468, 471, 381 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला .
तुळजाभवानी मातेला निझाम , औरंगजेब , पोर्तगीज यांच्यासह बिकानेर उदयपूर लखनो बडोदा आणि इंदोर या घराण्यांतील राजे महाराजे यांनी त्यांच्या चलनातील पुरातन नाणी देवि चारणी अर्पण केली होती . या नाण्याची नोंद तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या रेकॉर्डमध्ये १९८० पर्यंत होती मात्र २००५ व २०१८ मध्ये करण्यात आलेल्या पंचनाम्यात या पुरातन ७१ नाण्यांसह प्राचीन सोन्या चांदीच्या वस्तू आणि मौल्यवान अलंकार दप्तरी नोंदीत नसल्याचे उघड झाले होते.