जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी आग – कागदपत्रे व संगणक जळून खाक, उलटसुलट चर्चा – कारणांचा शोध सुरु
धाराशिव – समय सारथी
जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी आग लागली असुन या आगीत महत्वाची प्रशासकीय कागदपत्रे व संगणक यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथील पुरवठा व नगर परिषद प्रशासन विभागाला आग लागली आहे. अनेक कागदपत्रे जळून खाक तर संगणक यांचे मोठे नुकसान झाले आहे. आग आटोक्यात आली असुन आगीच्या कारणांचा शोध सुरु आहे.
नुकताच उघड झालेला करोडो रुपयांचा मध्यानह भोजन घोटाळा, नगर परिषदेतील विविध घोटाळे यासह अनेक अनेक चौकशी प्रकरणे व इतर कागदपत्रे ही नगर परिषद प्रशासन विभागात होती. कोणती कागदपत्रे जळून खाक झाली हे अजून समोर आले नाही. आग लागल्यानंतर लागली की लावली याची तर्कवितर्कसह मोठी चर्चा होत आहे.