जनता बँक निवडणुक – शिवसेना खासदार,आमदार, नगराध्यक्ष व नेत्यांनी भेट घेत दिला पाठींबा
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या निवडणुका होत असुन या निवडणुकीत शिवसेनेच्या नेत्यांनी नागदे-मोदाणी यांच्या जनता बँक विकास पॅनलला पाठिंबा दिला.
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळर, आमदार कैलास पाटील आणि उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदू राजेनिंबाळकर, शिवसेना तालुकप्रमुख सतीश सोमाणी, माजी शहर प्रमुख प्रवीण कोकाटे यांनी जनता बँकेचे विद्यमान चेअरमन ब्रिजलाल मोदानी आणि उस्मानाबाद जनता बँक सहकार विकास पॅनलच्या उमेदवारांची सदिच्छा भेट घेवून पाठिंबा देत शुभेच्छा दिल्या.यावेळी उमेदवार आशीष मोदाणी,काँग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, रोहीत बागल उपस्थित होते. या निवडणुकीत विद्यमान उपाध्यक्ष वैजिनाथ शिंदे, संचालक विश्वास शिंदे प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.
२०२१-२६ साठी निवडणुकीत उभ्या असलेल्या नागदे-मोदाणी यांच्या जनता बँक विकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांच्या कपबशी या चिन्हावर मतदारांनी आपले मत देऊन विजयी करावे, असे आवाहन यावेळी शिवसेना खासदार, आमदार, नगराध्यक्ष व नेत्यांनी केले.
उस्मानाबादसह सोलापूर लातूर बीड अहमदनगर व कर्नाटक राज्यातील बिदर या जिल्ह्यात ३० शाखा आहेत. त्यामुळे ही बँक मराठवाड्यातील अग्रगण्य अशी ही बँक असून या बँकेचे ७३ लाख ४५४ सभासद असून चार लाख ६५ हजार खातेदार आहेत.