गुन्हा नोंद करा – राणा दामपत्यावर गुन्हा नोंद करण्याची शिवसेनेची मागणी
उस्मानाबाद – समय सारथी
आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात शिवसेनेने उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यासाठी तक्रार दिली आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मुंडे यांच्यासह 4 जणांनी गुन्हा नोंद करण्याची तक्रार दिली आहे. उपशहर प्रमुख तुषार निंबाळकर, बंडू आदरकर, विजय घोणे यांनी तक्रार दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करून अपशब्द वापरले व दोन समाजात तेढ निर्माण करून तणावाचे वातावरण निर्माण करीत राज्याचे कायदा सुव्यवस्था बिगडविल्याचा आरोप केला आहे. शिवसैनिकाच्या भावना दुखाविल्याने राणा दामपत्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा ही इशारा दिला आहे.