धाराशिव – समय सारथी
खासदार ओमराजे निंबाळकर यांचे सोशल मीडियावरील व्हाट्स ऍप अकाउंट बॅन झाल्याने ओमराजे निंबाळकर जनतेपासुन नॉट रिचेबल झाले आहेत. गेल्या 5 दिवसापासून खासदार ओमराजे यांचे अकॉउंट बंद असुन त्यांनी पोलिस व प्रशासन दरबारी तक्रार केली आहे.
व्हाट्स ऍप अकॉउंट सुरु होत नसल्याने खासदार हतबल झाले असुन विरोधकांनी ठरवून व्हाट्स ऍप रिपोर्ट करून ते बॅन अर्थात बंद केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सोशल मीडिया बॅन करून माझ्या जनसंपर्कावर घाला घालण्याचा हा नीच प्रयत्न आहे. सरकार विरोधी भुमिका घेतल्याने कट कारस्थान करून ठरवून लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम सुरु असल्याचे ते म्हणाले.
व्हाट्स ऍप बंद असल्याने मेसेज येणे व जाणे बंद आहे. त्यामुळे अनेक नागरिक, ग्रामस्थ यांचा गैरसमज होत असुन त्यांनी पाठवलेले प्रश्न, समस्या सोडवता येत नाहीत असे ते म्हणाले.