क्रूरपणाचा कळस , उस्मानाबादेत सापाचे तुकडे करतानाचा व्हिडिओ व्हायरल
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात क्रूरपणाचा कळस पाहायला मिळाला, सापाचे तुकडे करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काही तरुणांनी जिवंत साप पकडून त्याचे तुकडे करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
हातात सत्तूर घेऊन सापाचे 5 तुकडे केले गेल्याचे त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सापाच्या डोक्याचे सुद्धा मधोमध दोन तुकडे या तरुणांनी अत्यंत निर्दयीपणे केले.5 ते 6 जणांच्या टोळीने केलेले हे क्रूर कृत्य कॅमेरात कैद झाले आहे. व्हिडिओमधील तरुण हे उस्मानाबाद जिल्ह्यातील येणेगूर व त्या भागातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.











