कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ – उस्मानाबाद जिल्ह्यात आज 242 कोरोना रुग्ण
उस्मानाबाद शहरात कोरोनाचा आकडा 100 पार , जिल्ह्यात 1 हजार 697 ऍक्टिव्ह रुग्ण
उस्मानाबाद : समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असून आजही कोरोना रुग्णांचा आकडा कायम राहिला, एकट्या उस्मानाबाद तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्यने शंभरी पार केली , त्यात उस्मानाबाद तालुक्यातील 139 रुग्ण असून त्यातील उस्मानाबाद शहरात 106 रुग्ण आहेत व उमरगा तालुक्यातील 19 रुग्णांचा समावेश आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा वाढत आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 1 हजार 697 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. उस्मानाबाद शहर व तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असून नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. उस्मानाबाद शहरात कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.
उस्मानाबाद शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलबजावणीचे तीनतेरा झाले असुन रोज शहरातील रुग्ण संख्या वाढत असल्याने हळूहळू स्तिथी नियंत्रणाबाहेर जात आहे याकडे जिल्हाधिकारी व नगर परिषद प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 1 लाख 55 हजार 981 नमुने तपासले त्यापैकी 20 हजार 282 रुग्ण सापडले त्यामुळे रुग्ण सापडण्याच दर 15.72 टक्के आहे. जिल्ह्यात 17 हजार 992 रुग्ण बरे झाले असून 88.71 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर आहे तर 593 रुग्णांचा मृत्यू झाला असून 2.92 टक्के मृत्यू दर आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यात आज 139 रुग्ण , तुळजापूर 20, उमरगा 19, लोहारा 12, कळंब 14, वाशी 19, भूम 01 व परंडा तालुक्यात 18 रुग्ण सापडले आहेत
कोरोनाचा वाढता आलेख पहा
1 मार्च – 9
2 मार्च – 40
3 मार्च – 16
4 मार्च – 45
5 मार्च – 26
6 मार्च – 30
7 मार्च – 49
8 मार्च – 16
9 मार्च – 38
10 मार्च – 24
11 मार्च – 58
12 मार्च – 27
13 मार्च – 54
14 मार्च – 69
15 मार्च – 52
16 मार्च – 123
17 मार्च – 94
18 मार्च – 164
19 मार्च – 119
20 मार्च – 125
21 मार्च – 118
22 मार्च – 173
23 मार्च – 130
24 मार्च – 176
25 मार्च – 174
26 मार्च – 155
27 मार्च – 224
28 मार्च – 184
29 मार्च – 239
30 मार्च – 242