कोरोना नाकाबंदी – उमरगा येथे गांजा तस्करी उघड – 78 किलो गांजासह एकास अटक
उस्मानाबाद – समय सारथी
कोरोना लॉकडाऊनमुळे सुरू असलेल्या नाकाबंदी दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथे गांजा तस्करी उघड झाली असून 78 किलो गांजासह एकास अटक करण्यात आली आहे.
कोविड- 19 साथीच्या पार्श्वभुमीवर उभारण्यात आलेल्या उमरगा तलमोड येथील आंतरराज्यीय तपासणी नाक्यावर 3 मे रोजी उमरगा पोलीस वाहनांची तपासणी करत होते. यावेळी एम.एच. 14 जी 6515 या वाहनाची पोलीसांनी तपासणी केली असता प्रकाश नरेंद्र बेहरा , रा. पुणे हा त्या वाहनातून गांजा तस्करी करताना सापडला. त्याच्याकडून 78.73 कि.ग्रॅ. गांजा अवैधरित्या वाहुन नेत असल्याचे आढळले यावरुन उमरगा सपोनि सिध्देश्वर गोरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन एन.डी.पी.एस. कायदा कलम- 20 (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.