कोरोनाने मयत झालेल्यांच्या वारसांना 50 हजार सानुग्रह मदत – जिल्हाधिकारी दिवेगावकर
अनुदानासाठी अर्ज करण्याची कार्यपध्दती लवकरच
उस्मानाबाद – समय सारथी
कोविड 19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून अर्ज सादर करण्याची ऑनलाईन कार्यपध्दती लवकरच अधिसूचित करण्यात येईल आणि याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल,असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
कोरोना संकटात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला यात घरातील कर्ते मंडळी वारल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले तर अनेक मुले अनाथ झाली त्यांना या मदतीचा आधार मिळणार आहे.
Ok