गुरुवारी जिल्ह्यात कोरोनाचे 92 रुग्ण तर 11 लहान बालके
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी आजचा दिवस घातक ठरला असून कोरोनाने तीन जणांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. गेल्या 15 दिवसापासून उस्मानाबाद जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा असुन कोरोना रुग्णांची संख्या शंभरच्या आसपास कायम आहे. गुरूवारी कोरोनाचे 92 रुग्ण सापडले तर 3 जणांचा मृत्यू झाला. उस्मानाबाद तालुक्यात 29 व परंडा तालुक्यात 28 रुग्ण सापडले असून जिल्ह्यात 2 हजार 084 पैकी 92 रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने पॉझिटिव्हीटी दर हा 4.41 टक्के इतका झाला आहे. जिल्ह्यात यापूर्वी 50 ते 60 च्या आसपास रुग्ण सापडत होते मात्र हा आकडा गेल्या 15 दिवसात 100 च्या जवळपास झाला असल्याने ही बाब चिंतेची आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात रुग्ण संख्या पुन्हा वाढत असल्याने काळजी घेण्याची गरज आहे. आजच्या 92 पैकी 11 रुग्ण हे 18 वर्ष वयोगटाखालील आहेत, ही बाबही चिंतेची आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 92 रुग्ण सापडले असून त्यात 39 रुग्ण हे आरटीपीसीआर चाचणीत तर 53 रुग्ण रॅपिड अँटीजन चाचणीत पॉझिटिव्ह आले आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील सर्वाधिक 29 रुग्णांचा समावेश आहे तर तुळजापूर 6, उमरगा 0, लोहारा 1, कळंब 13, वाशी 10 , भूम 5 व परंडा तालुक्यातील 28 रुग्णांचा समावेश आहे. गुरुवारी 3 जणांचा रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला त्यात उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उस्मानाबाद शहरातील ताजमहल टॉकीज येथील 51 वर्षीय पुरुष , परंडा येथील माळी गल्ली 50 वर्षीय स्त्रीचा परंडा उपजिल्हा रुग्णालयात तर तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात 70 वर्षीय स्त्रीचा उपचार दरम्यान मृत्यू झाला.
कोरोना आजाराबाबत कोणतीही प्राथमिक लक्षणे सापडल्यानंतर नागरिकांनी डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य तो वैद्यकीय उपचार घ्यावा तसेच लसीकरण करावे. कोरोना लाट रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टनस ठेवणेसह इतर नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.
गुरूवारी 111 रुग्ण उपचार नंतर बरे झाले असून 922 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजवर 62 हजार 153 रुग्ण बरे झाले असून हे प्रमाण 95.55 टक्के आहे तर 61 हजार 366 रुग्णांपैकी 1 हजार 438 रुग्णांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला असून मृत्यू दर हा 2.34 टक्के कायम आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात उपचार घेत असताना 1 हजार 438 रुग्णांचा मृत्यू झाला तर 321 रुग्ण हे बाहेर जिल्ह्यात उपचार घेत असताना व 101 जण पोस्ट कोविड गुंतागुंतमुळे मृत्यू झाला.
7 जुलै – 64 रुग्ण
8 जुलै – 62 रुग्ण
9 जुलै – 55 रुग्ण
10 जुलै – 58 रुग्ण
11 जुलै – 33 रुग्ण
12 जुलै – 67 रुग्ण
13 जुलै – 35 रुग्ण
14 जुलै – 61 रुग्ण
15 जुलै – 51 रुग्ण
16 जुलै – 54 रुग्ण
17 जुलै – 62 रुग्ण
18 जुलै – 57 रुग्ण
19 जुलै – 85 रुग्ण
20 जुलै – 45 रुग्ण
21 जुलै – 50 रुग्ण
22 जुलै – 60 रुग्ण
23 जुलै – 72 रुग्ण
24 जुलै – 69 रुग्ण
25 जुलै – 50 रुग्ण
26 जुलै- 83 रुग्ण
27 जुलै – 74 रुग्ण
28 जुलै – 102 रुग्ण
29 जुलै – 70 रुग्ण
30 जुलै – 72 रुग्ण
31 जुलै – 100 रुग्ण
1 ऑगस्ट – 83 रुग्ण
2 ऑगस्ट – 96 रुग्ण
3 ऑगस्ट – 105 रुग्ण
4 ऑगस्ट – 93 रुग्ण
5 ऑगस्ट – 71 रुग्ण
6 ऑगस्ट – 99 रुग्ण
7 ऑगस्ट – 60 रुग्ण
8 ऑगस्ट – 72 रुग्ण
9 ऑगस्ट – 94 रुग्ण
10 ऑगस्ट – 74 रुग्ण
11 ऑगस्ट – 98 रुग्ण
12 ऑगस्ट – 92 रुग्ण