केतकी चितळे विरोधात उस्मानाबादेत गुन्हा नोंद
उस्मानाबाद – समय सारथी
शरद पवार यांच्या बाबत सोशल मिडीयावर वादग्रस्त पोष्ट केल्याबद्दल उस्मानाबादेत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उस्मानाबाद शहर पोलिस स्टेशनमध्ये केतकी चितळे हिच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून याबाबत रोहित बागल यांनी गुन्हा नोंद करण्याची तक्रार दिली होती त्यानुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भादवी १८६० कलम ५०५(२), ५००, ५०१, १५३-अ याद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.