शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, युवासेनेचे प्रमुख तथा पर्यटनमंत्री आदीत्य ठाकरे यांनी आवाहन केल्याप्रमाणे अर्सेनिक अल्बम- 30 या होमियोपॅथिक गोळ्याचा डोस देण्यासाठी शिवसेना पक्षाकडुन सूरुवात करण्यात येत आहे. संपर्कप्रमुख प्रा. आमदार तानाजीराव सावंत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील यानी दिली आहे. जिल्ह्यातील 2 लाख 25 हजार नागरिकांना या गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे.
शिवसेनेच्या धोरणानुसार 80 टक्के समाजकारणाचे संस्कार पक्षामध्ये रुजविण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन अशा कोरोना संकटाच्या काळामध्ये नागरीकांच्या बरोबर शिवसेना पक्ष ठामपणे उभा आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संयमी व योग्य निर्णयक्षमतेचा अनुभव सध्या राज्याला पाहयला मिळत आहे. त्यांनी केलेल्या सुचनेनुसार जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्यात अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्याचे वितरण पक्षाच्यावतीने करण्यात येत आहे. याचा लाभ सर्वसामान्याबरोबरच जेष्ट नागरीक आणि कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना अधिक होणार आहे. कंटेन्मेंट झोन असलेल्या ठिकाणी सर्व नागरीकांना हा डोस दिला जाणार आहे. तर कोरोनाच्या संदर्भात जे लोक थेट फिल्डवर काम करत आहेत, त्यांनाही हा डोस शिवसेना पक्षाच्यावतीने देण्यात येणार असल्याची माहिती आमदार पाटील यानी दिली.
सध्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर वाढत असुन यामध्ये ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशा लोकांना याचा अधिक धोका असल्याचे दिसुन आले आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने अर्सेनिक अल्बम -30 या गोळीची शिफारस केलेली आहे. अनेक राज्यामध्ये याचा चांगला परिणाम देखील पाहयला मिळाला आहे. कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण सोडुन सगळ्यांचा या गोळ्या दिल्या जाऊ शकतात.या औषधाचे कोणतेही दुष्पारिणाम नाहीत, या गोळ्या लहान मुलापासुन ते वृध्द, गरोदर महिला, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर आजार असलेल्या व्यक्ती घेऊ शकतात. शिवसेनेच्यावतीने जिल्ह्यातील तब्बल सव्वा दोन लाख लोकांना पहिल्या टप्यात सहा लाख 75 गोळ्या वितरीत केल्या जाणार आहेत. कोरोना सहाय्यता कक्षामध्ये कर्तव्यावर असलेले कर्मचारी, शिक्षक, या शिवाय पोलीस, होमगार्ड, आशा कार्यकर्ती, ग्रामसेवकासह जे जे कोरोनाच्या लढाईत फिल्डवर काम करत आहेत अशा सगळ्यांना या गोळ्यांचे वितरण करण्यात येणार आहे. सध्या अनेक गावामध्ये रुग्ण आढळलेले आहेत, अशा सर्वच गावामधील नागरीकांना या गोळ्या दिल्या जाणार आहेत. शिराढोण (ता. कळंब) येथे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते गोळ्या वाटुन या उपक्रमाला सूरुवात करण्यात येत असल्याची माहितीही आमदार कैलास पाटील यानी केली आहे.
यावेळी आमदार कैलास पाटील,उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी हनुमंत वडगावे, पोलीस निरीक्षक जाधव,तालुका प्रमुख शिवाजी कापसे,बालाजी जाधवर,राजेश्वर पाटील पंचायत समिती सदस्य,सरपंच पद्माकर पाटील,डॉ रमेश जाधवर,डॉ चोपडे,नासिर पठाण,सुधीर महाजन,उदय माकोडे,डॉ जोगदंड, उपस्थित होते