कामात त्रुटी आढळल्यास सुट्टी नाही : आरोग्यमंत्री सावंत यांचा अधिकाऱ्यांना इशारा
राज्यातील शासकीय रुग्णालयांना सरप्राईज भेटी देणार, 10 दिवसांचा अल्टीमेटम
उस्मानाबाद – समय सारथी
राज्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी परंडा येथे आढावा बैठकीत असुविधेबाबत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. राज्यातील शासकीय रुग्णालयांना सरप्राईज भेटी देणार असुन यावेळी त्रुटी आढळल्यास त्याची माफी नाही, त्यांची सुट्टी म्हणजे हकालपट्टी करणार असा इशारा आरोग्य मंत्री सावंत यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलाय. अधिकाऱ्यांनी प्रशासकीय कामात व असुविधेबाबत येत्या 10 दिवसात सुधारणा करण्याचा अल्टीमेट दिला त्यानंतर त्रुटी आढळल्यास सुट्टी देणार असा इशारा दिला आहे.डॉ सावंत आज उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आहेत.