एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार – फडणवीस मंत्रीपद घेणार नाही
धाराशिव (उस्मानाबाद ) – समय सारथी
एकनाथ शिंदे हे आज रात्री मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशी घोषणा भाजपचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल यांच्या राजभवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. तसेच फडणवीस हे आगामी मंत्री मंडळात मंत्रिपद घेणार नसल्याचे जाहीर केले, ते मंत्रिमंडळ बाहेर असतील. भाजप बाहेरून पाठिंबा देऊन सत्तेत वाटा घेणार आहे.
यनिमित्ताने शिवसेनाला शह देण्यासाठी व मराठा मुख्यमंत्री हे दोन्ही कार्ड एकाच वेळी खेळल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे भाजप बाहेरून पाठिंबा देणार आहे व सत्तेत वाटा घेणार आहे आणि काही बिनसले तर हवा तेव्हा पाठिंबा काढता येणार आहे. शिवसेना सत्तेसाठी किंवा मुख्यमंत्री पदासाठी फोडली याचे खापर भाजप किंवा टीम देवेंद्र वर फोडता येणार नाही.