उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी शुक्रवारचा दिवस हा दिलासादायक ठरला असून जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही. जिल्ह्यात 822 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली मात्र त्यापैकी एकही जण पॉझिटिव्ह सापडला नाही, बऱ्याच दिवसानंतर असे दिलासादायक चित्र पाहायला मिळाले.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे सध्या 25 रुग्ण उपचार घेत असून जिल्ह्याची वाटचाल सध्या कोरोना मुक्तीकडे होताना दिसत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 67 हजार 656 रुग्णपैकी 65 हजार 555 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण 96.89 टक्के आहे तर 67 हजार 619 पैकी 1 हजार 501 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे त्यामुळे मृत्यूचे प्रमाण हे 2.34 टक्के इतके आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर कोरोनाने 2 हजार 76 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात उस्मानाबाद जिल्ह्यात 1501 मृत्यू तर 360 मृत्यू हे जिल्ह्याबाहेर उपचार घेत असताना झाले आहेत. 107 जणांचा मृत्यू हा दुर्धर आजार असल्याने झाला आहे तर पोस्ट कोविडमुळे 108 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या कोरनाचे 25 सक्रिय रुग्ण असून जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत असली तरी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.