उस्मानाबाद:-
उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या पहिल्याच फेरीत सत्ताधारी सहकार विकास पॅनल विजयाच्या उंबरठ्यावर आहे सभासद नि पुन्हा एकदा सत्ताधारी नागदे -मोदणी-शिंदे पुरस्कृत पॅनल वरती विश्वास दाखविला आहे . सर्वात जास्त इन्कम टॅक्स भरणारी व राज्यासह इतर राज्यातही शाखा असलेल्या नामांकीत उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या १४ संचालकासाठी निवडणुक पार पडली असुन या निवडणुकीत जिल्ह्यासह इतर जिल्हे व राज्यातील ३२ हजार ५७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ पासुन ५० टेबलवर सुरू झाली असुन दुपारी दोन वाजता पहिली* फेरी मतमोजणी संपली . या मतमोजणीत सत्ताधारी नागदे -मोदाणी -शिंदे पॅनलने साधारण ८ हजार ३०० मते घेत ७ हजाराच्या पुढे अघाडी घेतली आहे . सत्ताधारी पॅनल विजयाच्या उंबरठ्यावर आहे . विरोधी भाजपा प्रणीत परिवर्तन पॅनलला केवळ साधारण ११५० मतदान मिळाले आहे .