उद्योगक्रांती – तेरखेडा येथे “फटाका क्लस्टर” तर भूम, परंडा वाशी,शिराढोण येथे “एमआयडीसी” घोषणा
पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या पुढाकारातून उद्योगमंत्री सामंत यांचा निर्णय
धाराशिव – समय सारथी
राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी उदयोगमंत्री उदय सामंतांची भेट घेऊन उद्योग क्रांतीसाठी एमआयडीसी क्षेत्र करणाऱ्याची मागणी केली त्यावर चर्चा होऊन तेरखेडा येथे “फटाका क्लस्टर” तर भूम, परंडा वाशी,शिराढोण येथे “एमआयडीसी” घोषणा केली .पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत “एक्स्प्रेस टॉवर “नरीमन पॉईट मुंबई येथे झालेल्या बैठकीत ही घोषणा केली. पालकमंत्री सावंत यांनी मतदार संघात हरीतक्रांतीनंतर आता उद्योग क्रांती करीत आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्याचा चेहरा-मोहरा बदलून राज्यात तो औद्योगिक दृष्ट्या प्रगत करण्याच्या उद्देशाने पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत सातत्याने प्रयत्न करत असतात, त्यामधील हा स्तुत्य प्रयत्न. उस्मानाबाद जिल्हयाची ओळख राज्यात मागासलेला, शैक्षणिकदृष्ट्या अप्रगत जिल्हयात होत होती ती पुसून टाकण्याचा हा प्रयत्न जिल्ह्यात एमआयडीसी च्या माध्यामातून उद्योग खेचून आणत जिल्ह्यातील भूमिपुत्रांना नोकऱ्या, रोजगार व त्याच मधून आर्थिक विकास- साधण्यासाठी दूरदृष्टीने हा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला गेला. आर्थिक विकासापाठोपाठ विविध पुरक व्यवसाय व पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याचे यामागे धोरण आहे.
जिल्ह्याची दुरावस्था चालू असताना प्रा. डॉ. तानाजीरावांच्या रूपाने “विकासपुरुष” विकासा-त्मक कामासाठी लाभला ही चर्चा आहे. तेरखेड्याची ओळख राज्यातच नव्हे तर देशामध्ये “फटाका उत्पादनाच्या बाबतीत “आहे . ही ओळख, स्थानिकांचे कौशल्य व सदर ठिकाणचा पारंपारिक व्यवसाय याचा विकास होण्यासाठीच “फटाका क्लस्टची निर्मिती करण्यात येणार आहे. या माध्यमातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार व फटाका बाजारपेठेत तेरखेड्याचे अढळ स्थान निर्माण होईल हे निश्चितः
उस्मानाबाद जिल्ह्याच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक विकासास पोषक पुरक व पुढे घेऊन जाणारे हे पाऊल निश्चितच गौरवास्पद आहे.