आरोग्यास धोकादायक – न्यूज पेपरचा वापर खाद्यपदार्थ पॅकींगसाठी घातकी
पुणे – समय सारथी
न्यूज पेपरचा वापर खाद्य पदार्थ पॅकींगसाठी करण्यात येवु नये असे आदेश राज्याच्या अन्न व औषध विभागाचे सह आयुक्त शि स देसाई यांनी दिले आहेत.
अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 हा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात दिनांक 5 ऑगस्ट 2011 पासून लागू करण्यात आला आहे. सदर कायद्याचा प्रमुख उद्देश जनतेस सुरक्षित, सकस व निर्भेभ अन्न उपलब्ध करुन देणे हा आहे.अनेकदा लोकांमार्फत बाहेरुन नाष्टा मागविला जातो. त्यावेळी अन्न व्यवसायिक हे वडापाव, पोहे यासारखे अन्नपदार्थ न्युज पेपरमध्ये बांधून देतात. त्यामुळे जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. तसेच वृत्तपत्राची शाई ही केमिकलपासून बनविलेली असते. (डाय आयसोब्युटाइल फटालेट आणि डायइन आयसोब्युटाइल) या केमिकलचा वापर वृत्तपत्र छपाईसाठी करतात. अशा न्युजपेपरमध्ये गरम खाद्यपदार्थ पॅकींग करणे व ग्राहकांना देणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे भारतीय खाद्य सुरक्षा मानके प्राधिकरण भारतीय सरकार यांनी दिनांक 6 डिसेंबर 2016 रोजी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
सर्व अन्न व्यवसायिक छोटे मोटे हॉटेल्स, बेेकरी व्यवसायिक, स्नॅक्स सेंटर, स्वीटमार्ट, वडापाव, भजी व भेळ विक्रेते यांना सुचित करण्यात येते की, न्युज पेपरमध्ये अन्न पदार्थांचे पॅकींग त्वरीत बंद करावे अन्यथा आपणाविरुध्द अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नियम व नियमन 2011 अंतर्गत योग्य ती कडक कारवाई घेण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आदेशीत केले आहे.