आदेश निघाला – आता 3 लाख ऐवजी 10 लाखांच्या वरील कामासाठी ई निविदा
उस्मानाबाद – समय सारथी
आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, आणि ग्रामपंचायत स्तरावरील कामांसाठी ३ लाखांऐवजी १० लाखा रुपयांच्या वरील कामासाठी ई निविदा काढावी लागणार आहे . याबाबत राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने अध्यादेश काढला आहे,
फडणवीस सरकारने तीन लाखांवरील कामांसाठी निविदा काढणे बंधनकारक केले होते अखेर तो निर्णय बदलला आहे. आता दहा लाख रुपयापर्यंत काम ई-निविदा काढल्याशिवाय देता येणार आहे
.