आत्महत्या – व्हिडिओमध्ये एका डॉक्टर व राजकीय नेत्याचे नाव, मृतदेह भुम पोलीस ठाण्यात
अटक केल्यावरच मृतदेह ताब्यात द्या, गुंडाची दहशत
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील भुम येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असुन त्यात त्याने बार्शी येथील डॉ नंदकुमार स्वामी व भुम येथील सुरेश भाऊ कांबळे यांचे नाव घेतले आहे. मानसिक जाच व मारहाणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे सांगत त्याने स्थानिक पोलिसांवर यांच्यावर गंभीर आरोप करीत काही अपेक्षा सुद्धा व्यक्त केल्या आहेत.
फैयाज दाऊद पठाण असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. नेमका या तरुणाला काय व कोणत्या कारणाने जाच होता हे व्हिडिओमध्ये नसले तरी त्याला काल 20 जुन रोजी कांबळे यांनी मारहाण केल्याचे व धमकी दिल्याचे म्हणटले आहे.
पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेल्यावर तिथे सुद्धा बाहेर त्याला धमकावण्यात आले. पोलीस माझे काही करू शकत नाहीत, मी आत येऊन नाव सांगू का? असे धमाकावले. आत्महत्या केल्यावर कुटुंबाचे रक्षण करा. गुंड जर म्हणत असतील पोलीस माझे काही करू शकत नाहीत असे म्हणतात तर मग तुम्ही पोलीस चौकीला मोठे कुलपे लावा.तुमची काही गरज नाही.
माझा मृतदेह तेव्हाच कुटुंबाच्या ताब्यात द्या जेव्हा सुरेश भाऊ कांबळे, नंदकुमार स्वामी, अर्चना स्वामी व यश स्वामी हे पोलिसांच्या ताब्यात जेलमध्ये असतील. माझ्या मृतदेहाला मुंग्या लागल्या तरी चालेल मात्र तो देऊ नका अशी कळकळीची विनंती करीत आत्महत्या केली आहे.
भुम परंडा व वाशी या भागात वाळू माफिया, पवनचक्की माफियाची मोठी दहशत निर्माण झाली असुन यातून मारहाण, खंडणी सारखे प्रकार घडत आहेत. काल वाशी तालुक्यातील शेळगाव येथे 10-15 गुंडानी पवनचक्की साईटवर धुडगूस घालत मारहाण केली.