आत्महत्या नव्हे हत्या – अनैतिक संबंध, गुन्हा नोंद – महिलेला अटक – बालाजी भंडारे परिवाराचा हत्येचा आरोप
धाराशिव – समय सारथी
राज्य उत्पादक शुल्क विभागातील कॉन्स्टेबल बालाजी भंडारे यांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. अनैतिक संबंधातुन बालाजी यांनी कंटाळून आत्महत्या केल्या प्रकरणी आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसात नोंद करण्यात आला असुन आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. भंडारे भाड्याने राहत असलेल्या घरमालकीण शुभांगी नंदू जगताप हिला अटक केली आहे.
भंडारे हे साईराम नगर येथे किरायाने राहत होते त्या दरम्यान महिलेचे संबंध निर्माण झाले. घरमालकीण सतत फोन करुन व अनैतिक संबंध ठेवण्यासाठी पैशाची मागणी करुन त्रास देत होती. काय करावे हे कळत नसल्याने ते परेशान होते असे फिर्यादीत नमूद केले होते.
दरम्यान ही आत्महत्या नसुन हत्या आहे असा आरोप करीत खुनाचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी कुटुंबाने केली आहे. घटनास्थळी अनेक गोष्टी या संशयास्पद असुन महिलेवर गंभीर आरोप केले आहेत. भंडारे यांनी स्वतःच्या रूममध्ये आत्महत्या न करता घरमालकीण शुभांगी हिच्या बेडरूममध्ये कशी केली. घरमालकीण हिने पोलीस किंवा इतरांना न सांगता लवकर प्रेत काढले.