आता एकही आमदार, खासदार फुटणार नाही – आमदार कैलास पाटील यांचा दावा
उस्मानाबाद – समय सारथी
शिवसेनामधून कोणीही फुटणार नाही, एकही आमदार व खासदार आता शिंदे गटात जाणार नाही तसेच जे आमदार व खासदार सध्या उद्धव ठाकरे सोबत आहेत ते सोडून जाणार नाहीत असा दावा शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत, ज्यांनी दावा केला आहे ते याच उत्तर देऊ शकतील असे आमदार पाटील म्हणाले.
दसरा मेळाव्यात शिंदे गटात कोणी प्रवेश करणार नाही, कोणीही फुटणार नाही, शिंदे गटाचा दावा फोल ठरणार. शिंदे गटातील काही मंत्री ठाकरे गटातील आमदार खासदार संपर्कात असल्याचे व प्रवेश करणार असल्याचा दावा केला जात आहे मात्र तो फेल ठरेलं असे पाटील म्हणाले.
शिवतीर्थवर जाण्यासाठी उस्मानाबाद येथून खास 24 डब्याच्या रेल्वेची सोय केली असून तुळजाभवानी एक्सप्रेस या नावाने बुक केलेल्या गाडीत कार्यकर्ते जाणार असल्याचे ते म्हणाले.
आमची खरी शिवसेना असून परंपरागत दसरा मेळावा बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेल्या परंपरेनुसार शिवतीर्थावर होतो. तुळजाभवानी माता ठाकरे कुटुंबाची कुलदेवी असून पूर्वीप्रमाणेच देवीचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहील.