उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद शहरातील शेरखाने गल्लीतील एका संशयीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर जिल्ह्यात आज नवीन 8 रुग्ण सापडले आहेत . यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील इर्ला येथील 1, तुळजापूर व परंडा तालुक्यातील प्रत्येकी 2 तर उमरगा तालुक्यातील 3 रुग्णाचा समावेश आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 296 रुग्ण झाले आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली.
उस्मानाबाद शहरातील एका रुग्णाला श्वसनाचा त्रास होत असल्याने उपचारासाठी दाखल केले होते मात्र त्यांचा मृत्यू झाला , दरम्यान त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता मात्र तो इनकनक्लुझिव आला आहे, आयसीएमआरच्या नव्या मार्गदर्शक सूचनानुसार मयत व्यक्तीचे स्वॅब घेणेस मनाई करण्यात आल्याने मयत व्यक्तीचे स्वॅब घेतले जाणार नाहीत, मात्र याबाबत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना नियमाप्रमाणे राबविण्यात येणार असल्याची माहिती डॉ गलांडे यांनी दिली
दोन रुग्ण हे आवार पिंपरी परंडा तालुका येथील आहेत पूर्वीच्या पोजिटीव्ह पेशंटच्या संपर्कातील आहेत. दोन रुग्ण तुळजापूर येथील आहेत.उमरगा तालुक्यातील तीन रुग्ण असून त्यातील एक रुग्ण कसगी येथील व दोन उमरगा येथील आहेत ते पूर्वीच्या पोजिटीव्ह पेशंटच्या संपर्कातील आहेत.उस्मानाबाद तालुक्यातील इर्ला येथील रुग्ण पूर्वीच्या कोरोना पोजिटीव्ह पेशंटच्या संपर्कातील आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 296 रुग्ण सापडले असून त्यापैकी 198 जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत तर 84 जणांवर उपचार सुरू आहेत.